बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कुछ नही होता यार’ आता अजिबात चालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली धोक्याची घंटा

मुंबई | कोरोनाचा नवा ओमिक्राॅन व्हेरियेंट सध्या डोकं वर काढत असताना पाहायला मिळत आहे. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये राज्यातील नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये, सुरक्षित आंतर पाळावे, मास्क वापरावा असे आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री यांनी बैठकीला संबोधित करत असताना ‘कुछ नही होता यार’ असा पवित्रा अनेक लोकांनी घेतल्याचं बोलून दाखवलं. त्यामुळे आता कुछ नही होता यार हे अजिबात चालणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं आहे. तसेच हा पवित्रा आपल्याला मोठ्या संकटात टाकू शकतो, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.

परदेशातून आलेल्या नागरिकांवर राज्य सरकार विशेष लक्ष ठेवत आहे. तसेच नव्या विषाणूमुळे सध्या देशभर चिंता व्यक्त केली जात आहे. कोरोना आटोक्यात आला असताना अचानक नवा विषाणू डोकं वर काढत असल्याने राज्यासह संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे.

आणखी काही दिवस जनतेनं बंधने पाळण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं. तसेच मास्कचाही काटेकोरपणे वापर करणे आणि सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे, हे त्यांनी नमूद केलं आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी जाणून घ्या एका क्लिकवर

“वीज कनेक्शन तोडले, गावची गावे अंधारात जात आहेत आणि तुम्ही लग्नात नाचता?”

“…पण सरकारने जनतेला आपलं मानलं नाही, 2 वर्षात राज्य 20 वर्षे मागे गेलं”

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसावा म्हणून चक्क धरणातून सोडले पाणी, अधिकाऱ्यांचा प्रताप उघड

मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत चढउतार सुरूच, वाचा आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More