देश

“राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषित केलेले 1 कोटी गेले कुठे?; शिवसेनेचा एक पैसाही आला नाही”

अयोध्या | शिवसेनेने राम मंदिर उभारणीसाठी घोषित केलेल्या 1 कोटी रुपयांपैकी 1 रुपयाही पोहचला नाही, असं राम मंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं आहे.

सध्या राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने महंत गोपाल दास यांच्याशी संवाद साधला त्यात ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल दास यांनी दावा केला आहे की, शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या देणगीची जी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती, त्यातील एक रुपयाही ट्रस्टला मिळाला नाही.

महंताच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा दिवशी राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची देणगी ट्रस्टकडे जमा करण्यात आलेली आहे. 28 तारखेला ही रक्कम ट्रस्टकडे जमा झाली, असा दावा अनिल देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत महंत गोपालदास म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल, अयोध्येत कुणाला आमंत्रणाची गरज पडत नाही, ज्याची भावना आहे ज्याच प्रेम आहे तो आपोआपा येतो, असं महंत नृत्य गोपाल दास यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिग बींची कोरोनावर मात, अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

…तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल- संजय राऊत

महिला क्रिकेटपटूंसाठी IPL ची घोषणा लवकरच करणार- सौरव गांगुली

धक्कादायक! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘….तेव्हा भारताच्या लोकशाहीला तडा जातो’; राहुल गांधी मोदी सरकारवर संतापले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या