बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि सध्या सुरु असलेला समृद्धी महामार्ग यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधून, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम केल्यास, हे प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला जातील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

रेल्वे मंत्रालय, भारत सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या सात हाय स्पीड रेल कॉरिडॉरपैकी महाराष्ट्रात नागपूर-नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे-हैदराबाद यांचा समावेश आहे. राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) यांना जागेची पाहणी, व्यवहार्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएसआरडीसीकडे या कॉरिडॉरच्या एकीकरणासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

15 मार्च 2021 रोजी NHSRCL प्रतिनिधींनी पर्याय सादर केला आणि नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसोबत समृद्धी महामार्गाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता अभ्यासण्याची विनंती पत्रात केलीये.

जर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले, तर मुंबई-नाशिक-नागपूर हाय स्पीड रेलची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु केली जाऊ शकते. पुढे महाराष्ट्र सरकार असेही सुचवू इच्छिते की, मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे ही समृद्धी महामार्गाच्या RoW मध्ये जालन्यापर्यंत असेल, ती पुढे हैदराबादपर्यंत वाढवली ​​जाऊ शकते, असंही पत्रात म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आज ‘भारत बंद’ची हाक!

SBI सारख्या चार ते पाच मोठ्या बॅंकांची देशाला गरज- निर्मला सीतारामन

मनी हाईस्टच्या ‘बेला चाओ’ गाण्याच्या देशी व्हर्जनचा सोशल मीडियावर तुफान राडा, पाहा व्हिडीओ

पुढील 3 तासात राज्यातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…नाहीतर ओवैसींना भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचं अंगवस्त्र म्हणून पाहिलं जाईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More