Top News

सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!

बीड | केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे या विद्यार्थ्याने गळफास घेतला आहे. मी मेल्यानंतर तरी केंद्रआणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझं मरण सार्थक होईल, असं विवेक रहाडे याने सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचं लिहून त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.

विवेकवर दुपारी साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात एक चिठ्ठी आढळून आली आहे. आरक्षणाच्या स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

श्रीदेवीच्या ‘त्या’ सुपरहिट गाण्यावर अनिल कपूरने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल!

‘नटीला सुरक्षा देणारे कुठे आहेत?’; आठवले मैदानात उतरून देणार उत्तर

‘संजय राऊत नाहीत तर मग कोणालाच संधी नाही’; संजय राऊतांचा प्रतिसाद, कामराचं आमंत्रण स्वीकारलं

वाह संजू वाह एकदम कडक! संजू सॅमसनचा अप्रतिम झेल; पाहा व्हिडीओ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या