बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑस्ट्रेलियात चमकलं भारताचं सोनं, मीराबाई चानूला पहिलं सुवर्ण

गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया) | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळालं. मीराबाई चानू हिने वेटलिफ्टींगच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवत विक्रम केलाय.

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरूवात झालीय. भारताच्या गुरूराजने वेटलिफ्टिंगच्या 56 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई करून भारताचं खातं उघडलं. तर वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू हिने 189 किलो वजन उचलून भारताला पहिलं सुवर्ण मिळवून दिलं.

तसंच बॅडमिंटनमध्ये विजयी सुरूवात करत प्रणव आणि ऋत्विक जोडीने श्रीलंकेच्या जोडीला पराभूत केलं. पुरूष एकेरीमध्ये श्रीकांतने दुसरा विजय मिळवला.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More