छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून गोंधळ, पक्ष कार्यालयात तोडफोड!

छत्तीसगढ | छत्तीसगढमध्ये काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून जोरदार गोंधळ झाला. तसंच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या आणि कुंड्यांची तोडफोड केली.

छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्यावतीने उमेदवरांना तिकीट वाटप करण्यात येत होतं. त्यावेळी नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्यांदा 18 जागेवर मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारही निश्चित करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात 72 जागांवर मतदान होणार आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यासाठी काँग्रेसकडून 6 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. तेव्हा हा गोंधळ झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

-भुजबळ समर्थक आक्रमक; धमकी देणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी!

-एक पैसाही न देता शिक्षकभरती होणार; सरकार लवकरच 4738 जागा भरणार!

-माहीची मुलगी झीवा गिरवतीये 1,2,…चे धडे; व्हीडिओ व्हायरल

-तो बलात्कार नव्हता; परस्पर संमतीने शरिरसंबध होते; एम.जे.अकबरांचा खुलासा

-… तर या गोष्टीचा फायदा घेऊन भारत कसोटी सामन्यात जिंकू शकतो- सचिन तेंडुलकर