बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना कायमचा संपला नाही, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव ओसरत असल्याचं दिलासादायक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. रिकव्हरी रेट वाढत असताना कोरोना रूग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट देखील कमी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नागरिक देखील गाफिल झाले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे त्यामुळे महामारी कायमची संपली असं अनेकांना वाटत आहे. मात्र, कोरोना व्हायरस अजूनही आपल्या शरीरात आहे. त्यामुळे कोरोनाचा नवा व्हेरिएंट जगात कधीही येऊ शकतो. गाफिल राहणं बरोबर नाही, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस सतत बदलणारा आहे. उत्परिवर्तनामुळे हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमुळे बदलू शकतो. हा व्हेरिएंट जर वेगाने पसरला तर किंवा लस आणि नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणं वाढू शकतात, असा दावा कोविड तज्ज्ञ डॉ. जुगल किशोर यांनी केला आहे.

दरम्यान, लोकसंख्येचा मोठा भाग ओमिक्रॉनने संक्रमित झाला आहे. त्यामुळे नवीन लाट येण्याची शक्यता कमी असल्याची दिलासादायक माहिती देखील तज्ज्ञांनी दिली. तर जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. मात्र, लोकांनी याचा अर्थ कोरोना कायमचा संपला असा घेऊ नये, असं मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भाजपवर टीका करत एकनाथ खडसेंचा महाविकास आघाडीला घरचा आहेर, म्हणाले…

“…तर ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही”

नवाब मलिक यांचा जामीन फेटाळला; वाचा न्यायालयात नेमकं काय घडलं?

आदित्य ठाकरेंच्या एन्ट्रीची एकच चर्चा; राज्यपालांच्या अभिभाषणावर म्हणाले…

“राज्याच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचं नाव डांबराने लिहिलं जाईल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More