बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यात 2 आठवड्यात कोरोना रुग्णांची तब्बल 13 कोटींची लूट; तपासणीत धक्कादायक माहिती आली समोर

पुणे | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच खाजगी रुग्णालयांनी अवाजवी दर लावून कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या.

पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांनी दोन आठवड्यामध्ये कोरोना रुग्णांची तब्बल 12 कोटी 89 लाख 88 हजार 80 रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती तपासणीत समोर आली आहे. खाजगी रुग्णालयांनी तब्बल 13 कोटींच्या आसपास जास्तीची रक्कम रुग्णांकडून वसूल केल्याने एकच खळबळ माजली आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमधून खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांची लूट करत असल्याच्या अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून येत होत्या. त्यातच आता पुण्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट झाली असल्याची माहिती उघड झाल्याने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. रुग्णांच्या बिलांचं ऑडिट करण्यासाठी राज्य सरकारने तपासणी पथक नेमलं आहे.

तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत रुग्णांकडून देयकापोटी अधिकची 13 कोटी रुपये रक्कम खाजगी रुग्णालयांनी वसूल केल्याने ही जास्तीची रक्कम खासगी रुग्णालयांनी तात्काळ स्वरूपात संबंधित रुग्णांना परत द्यावी, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत आणि त्यांची फसवणूक झाली आहे. अशा रुग्णांना आता त्यांचे अतिरिक्त पैसे परत मिळणार आहेत. जिल्ह्यातील अतिरिक्त रक्कम वसूल करणाऱ्या व लूटमार करणाऱ्या या रुग्णालयांविरुद्ध जिल्हा प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

आनंदाची बातमी! पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

खुशखबर! अनलिमिटेड इंटरनेट पॅकसाठी ‘ही’ महापालिका चक्क विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करणार 1 हजार रुपये

मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संशयी प्रवृत्ती बळावल्या 5 महिन्यात तब्बल एवढ्या तक्रारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More