बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाॅझिटिव्ह आहात? घरीच उपचार घ्या; फक्त ‘या’ रूग्णांनी व्हायला हवं रूग्णालयात दाखल

मुंबई | कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आवश्यकता नसतानाही बरेच जण रूग्णालयात दाखल होण्यासाठी धावपळ करतात. कोरोनाबाधित रुग्णाला सौम्य लक्षणं असल्यास होम क्वारन्टाईनचा पर्यायही बरं होण्यासाठी सोयीस्कर ठरु शकतो. त्यामुळं रूग्णालयात दाखल होण्याची योग्य वेळ कोणती, हे प्रत्येकानं समजून घेणं गरजेचं आहे.

देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता भासत आहे. RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्याची घाई करु नका, असं आवाहन डॉक्टर करत आहेत. ज्या रुग्णांना ऑक्सिजन बेड किंवा व्हेंटिलेटर बेडची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी रुग्णालयात जागा ठेवा, विनाकारण बेड अडवू नका, असं आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. सौम्य लक्षणं असल्यास कोरोनाबाधित रुग्ण होम क्वारंटाईन होऊन उपचार घेत बरे होऊ शकतात. टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रमेश यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

रुग्णाने आपल्या आयसोलेशन कक्षात सहा मिनिटं चालण्यापूर्वी आणि चालल्यानंतर ऑक्सिजन रीडिंग घ्यावी. ही चाचणी एका दिवसात 2-3 वेळा घेतली जाऊ शकते, असं व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटलं आहे. जर हे रीडिंग सामान्य असेल तर रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही. बेसलाईन ऑक्सिजन सॅच्युरेशन 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल. 6 मिनिट वॉक टेस्ट आधी आणि नंतर यात 4 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घट असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अर्थात कुठल्याच कोरोनाग्रस्त रुग्णानं आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करु नये.

दरम्यान, पोषक आहाराव्यतिरिक्त कोरोनाग्रस्तांनी पाणी, ज्यूस यासारखे भरपूर द्रवपदार्थ, योग, प्राणायाम करावे. मन प्रसन्न ठेवून आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. सोबतच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी ताप आणि ऑक्सिजन पातळीवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. ऑक्सिजन पातळीच्या अचूक आकलनासाठी सहा मिनिट वॉक टेस्ट घेण्याविषयी सुचवण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

…त्यानंतर औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार सुरू- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

ऑक्सीजन मास्क काढून कोरोनाबाधित रुग्ण गेला पळून; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

दिलासादायक! ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टनमला पोचली, लवकरच महाराष्ट्रात परतणार

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आर्यन-गौरी, अन्यना पांडे परदेशी रवाना

रक्तातील ॲाक्सिजनची पातळी कशी वाढवावी?, ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करुन पाहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More