बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील दोघांना कोरोनाची लागण, तातडीने उपचार सुरु

मुंबई | जगभरात कोरोना संसर्गाचं थैमान सुरु असताना याच्या थेट झळा भारतालाही बसल्या आहेत. देशभरात 40 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे.

महाराष्ट्रातील पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. पुण्यात कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्ण नुकतेच दुबईला जाऊन आल्याचीही माहिती मिळत आहे.

दुबईहून आलेल्या या रुग्णांना तातडीने नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करुन तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान, दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यापैकी एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाहीत.

ट्रेंडिंग बातम्या-

“मनसेचे आमदार नाहीत म्हणून राज ठाकरेंनी नेत्यांना शॅडो कॅबिनेटचं काम दिलंय”

‘काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांची लवकरात लवकर सुटका करा’; पवारांंचं मोदी सरकारला पत्र

महत्वाच्या बातम्या-

माझ्याकडे जन्माचा दाखला नाही मग मी काय जीव देऊ का?; मुख्यमंत्र्यांचा मोदी-शहांना सवाल

भाजपवाल्यांनो यंदाच्या होळीत तुमचा अहंकार आणि सत्तेचा अवास्तव माज जाळा- अमोल मिटकरी

चंद्रकांत पाटलांच्या मुखी अजित दादांची स्तुती तर उद्धव ठाकरेंना पुणेरी टोमणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More