महाराष्ट्र मुंबई

गाडीवर लोगो शिवसेनेचा; काम गुंडगिरीचं… बंदुक दाखवून केलं ओव्हरटेक

मुंबई | शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले दोन जण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे.

जलील यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील वाहनकोंडी दिसत आहे. एका कारचा चालक आणि त्याच्या मागील सीटवरील एकाच्या हातात बंदूक आहे. दोघांचेही हात कारच्या बाहेर आहेत. त्यांच्या हातात बंदूक आहे. त्या बंदुका इतर वाहनांमधील व्यक्तींना दाखवत दोघे जण कोंडीतून वाट काढत गाडी पुढे नेताना दिसत आहे.

गाडीवरचा शिवसेनेचा लोगोच सगळं काही सांगत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा प्रकाराची दखल घेणार का?, असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला आहे.

रस्त्यावर बंदुका दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जलील यांनी केली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा प्रकार घडल्याचं जलील यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल”

“अण्णा नक्की कोणाच्या बाजूने?, हे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या”

शिक्षण खात्यातील नोकर भरतीबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा!

राकेश टिकैत यांनी अश्रू काय ढाळले; शेतकऱ्यांचा महापूरच आला!

सर्वसामान्यांना झटका; वीजपुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा निर्णय

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या