वाराणसी | दिवाळीत श्रीरामाची आरती करणाऱ्या मुस्लीम महिलांना ‘दारूल उलुम देवबंद’नं धर्मातून बहिष्कृत केलंय. अल्लाशिवाय कोणत्याही देवाला मानणारा मुस्लीम असूच शकत नाही, असंही म्हटलंय.
दारूल उलुम देवबंदनं ज्यांनी श्रीरामाची आरती केलीय त्या महिलांनी अल्लाची माफी मागून, कलमा वाचून पुन्हा धर्मात यावं असा अजब सल्ला दिलाय.
दरम्यान, श्रीराम आपले पूर्वज असून आपलं नाव, धर्म बदलू शकतात पण पूर्वज नाही अशी भूमिका आरती करणाऱ्या महिलांनी घेतलीय.
Comments are closed.