बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलंय.

कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावं लागतं. यासंदर्भातील निर्णय तत्काळ घ्यावा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असं असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

“पवार साहेब, दारुवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले पण…”

हसतं-खेळतं घर कोरोनामुळे उद्ध्वस्त; एकाच दिवशी दोन्ही मुलांचा मृत्यू

“मराठा आरक्षणासाठी 2 दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा”; ‘या’ माजी विधानसभा अध्यक्षांची मागणी

सोनिया गांधींनी पुन्हा एकदा दाखवला ‘या’ नेत्यावर विश्वास सोपवली महत्वाची जबाबदारी 

विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! महापोर्टलवर परीक्षा घेण्यास MPSC ची तयारी

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More