बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खरंच प्रायश्चित्त करायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…”

बुलडाणा | आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया (Praveen Togadia) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर देशातील अनेक मुद्यांवरून टीका केली आहे. 19 नोव्हेंबरला देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदींनी तीन कृषी कायदे (Three agricultural laws) मागे घेणार असल्याची घोषणा केली. तसेच घटनात्मकरित्या कृषी कायदे रद्द करण्यात आले आहेत. यावेळी प्रवीण तोगडिया यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारला सुनावलं आहे. बुलडाणा येथे ते एका कार्यक्रमात संबोधित करत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल अभिनंदन. परंतु, हेच पाऊल 10 महिने अगोदर उचलले असते तर 700 शेतकऱ्यांचा बळी गेला नसता. नरेंद्र मोदींना याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर शेतकरी आंदोलनात मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी देण्याची मागणी प्रविण तोगडिया यांनी केली आहे.

शेतकरी कुटूंबियांना 700 कोटी रूपयांची मदत देणं खूप काही कठीण नाही. मोदी सरकारने त्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी देखील तोगडिया यांनी केली आहे. तसेच नरेंद्र मोदी, अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) आणि मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या कार्यकाळात विकासकामे झाली परंतु, गरिबांची गरिबी वाढत असल्याचं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना प्रवीण तोगडिया यांनी मुस्लिम समाजाच्या नमाजावरून वक्तव्य केलं आहे. सार्वजानिक ठिकाणी मुसलमानांनी नमाज पठण करू नये. त्यांनी नमाज पठण मस्जिदमध्ये करावे किंवा त्यांच्या घरात नमाज पठण करावे, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे.तीन तलाकवर कायदा येऊ शकतो तर काशी आणि मथुरेसाठी देखील आला पाहिजे, असंही प्रवीण तोगडिया म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

मोठी बातमी! हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपिन रावत यांचं निधन

IAF Helicopter Crash: अपघातात 14 पैकी 13 जणांचा मृत्यू; आली महत्त्वाची माहिती समोर

“मी पाहिलं की आग लागलेल्या अवस्थेत…”; प्रत्यक्षदर्शीनं सांगितली बिपीन रावत यांच्या अपघाताची माहिती

अपघाताच्या 24 तासांपूर्वी बिपीन रावत यांनी दिला होता ‘हा’ गंभीर इशारा

“2024 मध्ये भाजपचे 418 खासदार येणार, सगळे मोदींनाच मतदान करणार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More