मुंबई | अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणी नोटीस पाठवली आहे. यावरून आता चांगल.च राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. ईडी ही एक स्वतंत्रपणे काम करणारी संस्था आहे. चूक नसेल राज ठाकरेंनी घाबरण्याचं कारण नाही… मात्र चूक असेल तर भोगावं लागेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
22 ऑगस्टला मनसेने ठाणे बंदची हाक दिली आहे. त्यावर मनसेने नाहक नागरिकांना त्रास देऊ नये. जर खरंच तुमचं काहीही चूकलं नसेल तर ते कोर्टात सांगा… तुमच्या वकिलांना सांगा… जनतेला कशाला त्रास देताय, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज ठाकरे यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप मनसेने केला आहे. त्यावर या देशात लोकशाही आहे. आरोप कोणीही कुणावर करू शकतं. मात्र राज यांना पाठवलेली नोटीस ही राजकीय द्वेषातून पाठवली नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, राज यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसीबद्दल मला अजून पूर्ण माहिती नाहीये. मी अधिक यावर बोलणार नाही, अशी पुष्टी त्यांनी यावेळी जोडली.
महत्वाच्या बातम्या-
-वादग्रस्त ट्वीटनंतर शेहला रशीद यांच्या अटकेची मागणी
-“भाजप म्हणजे डोळे मिटून दूध पिणारे मांजर; माझा नवरा घाबरणारा नाही”
-राज ठाकरे ईडी-बीडीला भीक घालत नाहीत… आमचा त्यांना पाठिंबा- राष्ट्रवादी
-“भारतीय कायदा म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बापाची जहागीर नाही”
-काँग्रेसचा ‘हात’ झिडकारून या आमदार शिवसेनेत प्रवेश करणार!
Comments are closed.