बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वारीस की लावारीस त्याला सोडणार नाही; देवेंद्र फडणवीस आक्रमक

मुंबई | कोणी तरी म्हणतो 100 कोटी वर 15 कोटी भारी आहे , वारीस का लावरीस. त्याला सोडणार नाही. सेना फक्त मूक गिळून बसली आहे, असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाण यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून सरकारला देखील धारेवर धरलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानावर सरकार विरोधात आंदोलन करण्यात आलं. फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

शिवाजी महाराजांचा अपमान झाला तरी चालेल मात्र आम्ही खुर्ची सोडणार नाही, अशी शिवसेनेची भूमिका आहे. पण भाजप शिवाजी महाराजांच्या वंशजांचा अपमान सहन करणार नाही. कोण आहे तो वारिस की लावारिस?, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हे सरकार जनतेने निवडून दिलेलं नाही, तडजोड करुन सत्तेवर आलेलं सरकार आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या- 

…तर शेतकरी कर्जमाफीला 400 महिने लागतील- देवेंद्र फडणवीस

देशाला अस्वस्थ करणारी ही दृश्यं तुम्ही पाहिली का?

महत्वाच्या बातम्या- 

आज वो हुए मशहूर जो काबिल न थे…- देवेंद्र फडणवीस

‘हे सरकार तर गजनीचा बाप’; मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला टोला

शेतकऱ्यांची ‘ती’ पत्रं घेऊन विरोधी पक्ष आज राज्यपालांची भेट घेणार- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More