पुणे महाराष्ट्र

तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?- देवेंद्र फडणवीस

पुणे | शिवसेनेच्या नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून ते भाजपला महाराष्ट्रद्रोही म्हणत आहेत. मात्र, आपण म्हणजे महाराष्ट्र आहोत, हे शिवसेनेच्या नेत्यांनी समजू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

कोणाच्या म्हणण्याने कोणी महाराष्ट्रद्रोही होत नाही. आम्ही पण महाराष्ट्रातीलच नेते आहोत, आम्हालाही राज्याच्या अस्मितेचे भान आहे, असं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला दिलं आहे.

दरम्यान, आपल्या अंगावर आलं की दुसऱ्याला महाराष्ट्रद्रोही म्हणायचं, अशी शिवसेनेची कार्यपद्धती आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे,

महत्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत, ते तर…- चंद्रकांत पाटील

“अडचणीत आणायचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडी अधिक बळकट होईल”

“फक्त गाण्याचा एक कार्यक्रम ठेवा, मग कराची आपलीच”

‘शाळा सुरु करा, आमचं नुकसान होतंय’; विद्यार्थ्याचा थेट मुख्यमंत्र्यांना मेसेज

‘आम्ही चौकशीला घाबरत नाही’; प्रवीण दरेकरांचं सरकारला आव्हान

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या