महाराष्ट्र मुंबई

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी आदित्य ठाकरेंनी अभ्यास करावा- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

आदित्य ठाकरे हे तरुण आहेत. नवीन मंत्री आहेत. त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत, किमान आदित्य ठाकरे यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा. कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.

कांजूरमार्ग कारशेडप्रकरणी जेवढा उशीर केला जाईल, तेवढा खर्च वाढणार आहे. त्यामुळे मुंबईकरांवरच त्याचा आर्थिक भार येणार असल्याने राज्य सरकारने आपला ईगो सोडून द्यावा आणि जनतेचं नुकसान करू नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गप्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे. त्याने काय फरक पडणार आहे? सत्य तर बदलता येणार नाही. त्यामुळे सत्य स्वीकारून राज्य सरकारने पुढे गेलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या