बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

नागपूर | ईडी आणि सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय सुडबुद्धीने केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्राच्या यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केलं जात असल्याचा आरोप केला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिक्षाभूमी येथेही भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणेचा वापर चुकीच्या पद्धतीन केला जात असल्याची भूमिका मांडली. ते म्हणाले, सध्या केंद्राच्या तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होतोय असं सांगत हे असं कधी होत नव्हतं, अशी खंत देखील व्यक्त केली आहे.

यावेळी त्यांनी नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील संघर्षावर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, नवाब मलिक आणि आर्यन खान हे दोन वेगवेगळे विषय आहेत. नवाब मलिक यांचा एनसीबी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांवर काही आक्षेप आहेत, ते असू शकतात, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

याआधी छगन भुजबळ यांनीही ईडीच्या कारवाईवरून भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. आजवर कुठल्याही राजकीय पक्षाने ईडीचा इतका गैरवापर केला नसेल तितका भाजपचे नेते करत आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. त्यानंतर आता दिलीप वळसे यांनी केंद्रीय यंत्रणावर टीका केली आहे.

थो़डक्यात बातम्या-

शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत, पाहा व्हिडीओ

“तू ये बता की अनिल देशमुख कहा है और मुख्यमंत्री मंत्रालय कब जायेगें”

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे, वाचा एका क्लिकवर

“कोरोनाविरोधातील युद्ध अजून संपलेलं नाही, सण-उत्सवाच्या काळात सतर्क राहा”

समीर वानखेडेंची चौकशी करणार का?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More