बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन, ऊस, कापूस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश प्रशासनास दिलं आहेत.

तुम्ही धीर सोडू नका, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणार, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे. सरकार म्हणून राज्यातील शेतकऱ्यांच्या आम्ही पाठीशी आहोत. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून घेतला आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना तात्काळ मदतीचे निर्देश दिले आहेत.

काही ठिकाणी पुराच्या पाण्यातून जवानांनी सुटका केली आहे. तसेच त्यांचे लवकरात लवकर स्थलांत्तर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांसोबत चर्चा केली असून या आपत्तीमध्ये प्रशासनानं नागरिकांच्या बचावासाठी लक्ष द्यावे सोबतच सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रशासनास सांगितलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल सायंकाळी आणि आज सकाळी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे तसेच मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत.

थोडक्यात बातम्या –

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट कायम; वाचा आजची आकडेवारी

रिक्षाचालक झाला देवदूत! समोर रेल्वे, तरूणी रूळावर उभी तितक्यात…, पाहा व्हिडीओ

“संजय राऊत आणि नवज्योतसिंग सिद्धू म्हणजे जुळे भाऊ”

‘…तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही’; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

“नेमका ‘हाच’ फरक आहे भाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेतला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More