Top News पुणे महाराष्ट्र

DYSP पैलवान राहुल आवारेने आपले गुरू काका पवारांच्या लेकीला बनवलं जीवनसाथी

पुणे | डीवायएसपी पैलवान राहुल आवारेने अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर काकासाहेब पवार यांची कन्या ऐश्वर्या पवारसोबत विवाह केला आहे. रविवारी पुण्यामध्ये पुण्यामध्ये हा विवाह सोहळा पार पडला.

राहुलने आपलं कुस्तीवरचं प्रेम किती आहे हे आपल्या मेहेंदीतूनदेखील दाखवून दिलं आहे. त्याने आपल्या मेहेंदीत ऑलिम्पिकची पाच वर्तुळं काढत, रेसलिंग इज माय लाईफ, असं लिहिलं आहे.

प्रियांकाशी लग्न करुन राहुल आवारे त्याचे गुरु भारताचे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु काकासाहेब पवार यांचा जावई झाला. काका पवारांनी भारताला 31 पदके जिंकून दिली आहेत. राहुलनेही राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या फ्री-स्टाईल कुस्तीत  सुवर्णपदकाची कमाई केली होती.

दरम्यान, राहुल आवारेच्या विवाहसोहळ्याला दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही औरंगाबादच्या नामांतरला विरोध!

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकल्याने सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका”

“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही”

‘विदर्भवासियांनो मी तुम्हाला वचन देतो की…’; मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द

“6 जूनला राज्यभरात साजरा केला जाणार ‘शिव स्वराज्य दिन’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या