बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आठ वर्षीय चिमुकलीनं स्वर्गाचा पत्ता टाकत लिहिलं दिवंगत वडिलांना पत्र!

नवी दिल्ली | ‘फादर्स डे’ निमित्त अनेक मुलं आपल्या वडिलांना शुभेच्छा देत त्यांच्याविषयी आपलं प्रेम व्यक्त करत असतात. मात्र सध्या एक व्हायरल होणाऱ्या फोटोतून आठ वर्षाच्या चिमुकलीनं आपल्या दिवंगत वडिलांना पत्र लिहिल्याची एक भावनिक घटना समोर आली आहे.

आठ वर्षाच्या चिमुकलीनं फादर्स डे निमित्त आपल्या मृत वडिलांना पत्र लिहिलं होतं. मात्र ते या जगात नसल्यानं तिनं चक्क स्वर्गाचा पत्ता लिहीत पत्र ते पोस्ट बॉक्समध्ये टाकलं. हे पत्र सिमोन नामक एका पोस्टमनच्या हाती लागलं. पत्रावर वैध तिकिटं व पत्ता नसल्यानं पत्र धुळ घात पडेल म्हणून सिमोन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कुटुंबियांचा शोध घेतला.

या पोस्टनं सिमोन यांना सारा टल्ली यांच्या आठ वर्षीय मुलीचं पत्र असल्याचं समजलं. आमची मुलगी चार महिन्यांची असताना पती टोनी टल्ली यांचं निधन झालं. यानंतर आमची मुलगी आपल्या दिवंगत वडिलांना पत्र लिहून आपलं प्रेम व्यक्त करत असते. ती तिच्या वडिलांना खूप मिस करते, असं आठ वर्षीय मुलीची आई सारा यांनी सांगितलं.

दरम्यान, सोशल मीडियावर सिमोन यांच्या पोस्टला भरपूर प्रतिसाद मिळाला. सारा यांनी सांगितलं की, मी या पत्राचे फोटो, स्क्रीनशाॅट जपून ठेवेल आणि माझी मुलगी मोठी झाल्यावर हे तिला दाखवेल.

थोडक्यात बातम्या – 

‘या’ मंदिरात दर्शनासाठी लागणार लसीकरण प्रमाणपत्र!

पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

‘लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही’; पवारांनी युजीसीवर साधला निशाणा

‘जयललिता’ नंतर आता ‘इंदिरा गांधी’च्या भूमिकेत झळकणार कंगना रणौत

‘या’ जिल्ह्यातील 30 कोविड सेंटर बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; आरोग्य कर्मचारी बेरोजगार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More