…अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घालणार- खडसे

एकनाथ खडसे

जळगाव | राज्यात १५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प येत आहेत मात्र यातील एकही खान्देशसाठी नाही, खान्देशवरचा अन्याय दूर झाला नाही तर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घालणार, असा इशारा भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला दिलाय. 

अमळनेर तालुक्यातील लोणसीम येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

आतापर्यंत पाय चाटत होते त्यांची अनेक पापं सुधारणा व्हावी म्हणून झाकली, हे पावसाळी बेडूक सध्या हंगामी डराव डराव करत आहेत. मी कुणाचं नुकसान केलं नाही तरी मला सत्तेपासून बाजूला केलं, मात्र सत्तेसाठी मी लाचार होणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.