गुजरात निवडणुकीत भाजपला ‘पप्पू’ नाव वापरण्यास मनाई!

अहमदाबाद | गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘पप्पू’ नाव वापरण्यास निवडणूक आयोगाने आक्षेप घेतलाय. भाजपने पप्पू नावाचा वापर करु नये, असे आदेशच निवडणूक आयोगानं दिलेत. 

निवडणूक आयोगाने यासंदर्भात भाजपला पत्र पाठवलंय. निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिराती, होर्डिंग्ज, पोस्टर आणि बॅनर्सवर पप्पू नावाचा वापर करु नये, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय. 

निवडणूक आयोगाने भाजपच्या प्रचार साहित्यांचं परीक्षण केलं. त्यानंतर एका व्यक्तीला उद्देशून पप्पू शब्दाचा वापर करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर हे आदेश देण्यात आले.