ट्विटरनंतर एलॉन मस्क खरेदी करणार ‘ही’ मोठी कंपनी, ट्विट करत म्हणाले…
नवी दिल्ली | जगातील सर्वात श्रीमंत व प्रसिद्ध व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) यांनी दोनच दिवसांपूर्वी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरची (Twitter) खरेदी केली. ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी ट्विट करत आणखी एक मोठी कंपनी खरेदी करणार असल्याचं सांगितलं आहे.
ट्विटर खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क यांनी केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत शीतपेय कंपनी कोका कोला (Coca-Cola) खरेदी करणार असल्याचं म्हटलं आहे.
मी आता कोका कोला खरेदी करणार आहे, जेणेकरून मला त्यात कोकेन टाकता येईल, असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं आहे. त्यानंतर एलॉन मस्क यांनी मॅकडॉनल्ड्स खरेदी करणार असल्याचं एक ट्विट शेअर करत मी चमत्कार करू शकत नाही, असं सांगितलं.
दरम्यान, एलॉन मस्क यांनी हे ट्विट्स मस्करी म्हणून केले असले तरी याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. तर नेटकरी देखील या ट्विटला मजेशीर उत्तरं देताना दिसत आहेत. तब्बल 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटरची खरेदी केल्यानंतर एलॉन मस्क सातत्याने चर्चेत आहेत.
Next I’m buying Coca-Cola to put the cocaine back in
— Elon Musk (@elonmusk) April 28, 2022
थोडक्यात बातम्या-
खऱ्या आयुष्यातील जोडी मोठ्या पडद्यावरही एकत्र, ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटातील खास फोटो समोर
मोठी बातमी! या अटी-शर्तींसह राज ठाकरेंची सभा होणार?
राज्यात कोरोनाचे नवे variant आढळल्यानंतर राजेश टोपेंनी दिली ‘ही’ अत्यंत महत्त्वाची माहिती
रशियाच्या इशाऱ्याला अमेरिकेकडून केराची टोपली, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
Comments are closed.