मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. शिवसेनेचं मुखपत्र सामना याच्या रोखठोक सदरातून पंतप्रधानांवर टीका करण्यात आली आहे.
नुकतंच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जय श्रीरामचे नारे दिले होते. पण रामाचं राज्य येऊनही करोनाचा रावण मारला जात नाही अशी टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलीये.
इतर कोणामुळे तरी आपल्यावर दुःख कोसळलं असं समजणं चुकीचं आहे. तसंच ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतूच आहे. तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते!, असं म्हणत अर्णब गोस्वामीच्या अटकेवरून भाजपला चिमटे काढलेत.
राऊत पुढे लिहीतात, “दिवाळीचा सण यावेळी फिका जाईल असं वाटलं होतं. तो समज आपल्या लोकांनी ठरवून खोटा पाडला. कोरोनाची वगैरे पर्वा न करता खरेदीसाठी गर्दी केली. गर्दीत बहुदा कोरोना चिरडून मरेल असा विनोदही काही लोकांनी केलाय.”
महत्वाच्या बातम्या-
बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता
“किरीट सोमय्या यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांनी…”
नितीश कुमारांनी दिला राजीनामा, नेता निवडीसाठी एनडीएची उद्या बैठक
सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच- संजय राऊत
भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं- संजय राऊत
Comments are closed.