बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शेतकऱ्याला दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा व हाताला चाटायचा”

मुंबई । माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीये. सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

सदाभाऊ खोत म्हणाले, “कोरोनाच्या काळात राज्यातील शेतकरी होरपळून निघालाय. राज्याच्या शेतकऱ्यांना दिलेली मदत म्हणजे कोपराला गूळ लावायचा आणि हाताला चाटायचा.”
ते पुढे म्हणाले, “सरकारने 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय. मात्र हे पॅकेज पाहलं तर ग्रामीण रस्ते, पाटबंधारे, पाणीपुरवठा विभाग यांना निधी वाटून देण्यात आलाय. यामुळे शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ 5 हजार कोटी येतील. म्हणून ही मदत शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.”
कोरोनाने पहिलीच शेतकऱ्याची वाट लावली असून आता दिवाळी ही कडू दिवाळी म्हणून साजरी होतेय. दिवाळी तोंडावर असून सरकारने लवकर मदत देऊन मेहरबानी करावी, असंही सदाभाऊ खोत म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

पोलीस समोर आला; वाहनचालक त्याला बोनेटवर घेऊन निघाला; थरार CCTVत कैद!

 

ऑनलाईन वर्गाला ‘इतक्या’ दिवसांची दिवाळी सुट्टी जाहीर!

नाट्यगृहांचं भाडं कमी करणार- मुख्यमंत्री

मुंबईकडून दिल्लीचा पराभव; सहाव्यांदा मिळवलं फायनलचं तिकीट

अर्णब गोस्वामींच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More