12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली?, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण
मुंबई | राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांकडे नसल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. यावरून शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी अग्रलेखातून राज्यपालांवर निशाणा साधला होता. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र अशातच नियुक्त आमदारांची यादीबाबत महत्त्वाची माहिती समजत आहे. गेल्यावर्षी 6 नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीतील नवाब मलिक, अमित देशमुख आणि अनिल परब या तीन मंत्र्यांनी राजभवनवर जावून 12 नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती.
तेव्हापासून राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले असून, अद्याप या यादीबाबत निर्णय का घेतला नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने 21 मे रोजी केली होती. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही 12 जणांची यादी राज्यपाल सचिवालयाकडे मागितली होती. मात्र, अशी यादी उपलब्ध नसल्याचे उत्तर सचिवालयाने दिलं. त्याचा आधार घेत शिवसेनेच्या मुखपत्रात 12 नावांची यादी भुतांनी पळवली का?, असा सवाल करण्यात आला होता.
माहिती अधिकारात ही यादी मागण्यात आली होती. ती देता येणे गोपनीयतेच्या कारणाने राजभवनला शक्य नव्हते. महाविकास आघाडी सरकारकडून यादी देण्यात आली, तेव्हाही 12 जणांची नावे अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसल्याचं राज्यपाल कार्यालयाने सांगितलं आहे.
दरम्यान, राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील विशिष्ट पत्रव्यवहार उघड न करण्याचा या दोन्ही घटनात्मक संस्थांना कायदेशीर अधिकार आहे. अशावेळी ‘ही यादी आमच्याकडे उपलब्ध नाही’ अस उत्तर देण्याऐवजी राजभवनने ‘सदर पत्रव्यवहार उघड करता येणार नाही’, अस उत्तर कायद्याचा आधार घेत दिलं असतं तर अधिक सुयोग्य ठरलं असतं, असं कायद्याच्या जाणकारांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
लग्नाचा पहिला वाढदिवस, पत्नीने सांगितलं पार्लरला जायचं अन् त्यानंतर घडला ‘हा’ प्रकार
‘देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली पण…’ निलेश राणे यांच्या आरोपावर उदय सामंतांचं स्पष्टीकरण
“महागाईचं भांडवल करून सत्तेत आलेल्यांना सामान्य जनतेचा कळवळा उरला नाही”
Comments are closed.