बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सर्वगुण संपन्न असला तरी…’ खंत व्यक्त करत शिल्पा शेट्टीने केला राज कुंद्राचा खुलासा

मुंबई | बाॅलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि सतत चर्चेत असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि उद्योगपती राज कुंद्रा यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ही जोडी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. आपला पती राज कुंद्रा सर्वगुण संपन्न आहे, मात्र त्याच्या एका गोष्टीची शिल्पाला प्रचंड खंत वाटत असल्याचं तिने म्हटलं आहे.

‘सुपर डान्स 4’ च्या मंचावर कुमार सानूच्या स्वागतावेळी शिल्पाने आपला पती राज कुंद्रा सर्वगुण संपन्न असला तरी गाता येत नसल्याचं सांगितलं आहे. यावेळी कभी हा, कभी ना हे गाणं राज कुंद्रा यांचं प्रचंड आवडीचं असल्याने  गायक कुमार सानूला ते गाणं गाण्याची विनंती शिल्पाने केली होती.

या संपुर्ण मजेशीर वेळादरम्यान शिल्पाने माझ्या नवर्‍याने हे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि मी हे ओळखले की, गाणं म्हणणं त्याचं काम नाही, असं सांगितलं आहे. यानंतर कुमार सानूने आपण राज कुंद्राला कधीच भेटलेलो नसलो तरी राज कितीही चांगला किंवा वाईट गायक असला तरी त्याला जेव्हा गरज असेल, तेव्हा त्याला मदत करण्यास मी तत्पर असल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीने केलेल्या आरोपावर राज कुंद्राने आपलं मौन सोडलं होतं. यावेळी देखील ही जोडी प्रचंड चर्चेत आली होती. शिल्पा शेट्टी ही राज कुंद्रा यांची दुसरी पत्नी असून पहिल्या पत्नीकडून राज यांना एक मुलगी आहे. मात्र ते आपल्या मुलीला घटस्फोटानंतर कधीच भेटले नसल्याचीही चर्चा आहे.

थोडक्यात बातम्या-

‘100 कोटी घ्या अन् भाजपला विरोध करा’; आप आणि काँग्रेसची ‘या’ संताला ऑफर???

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More