बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीच्या नेत्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

मुंबई | परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय टीकाटिप्पणीला उधाण आलं आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेनंतर आता फडणवीसांवरही राष्ट्रवादीकडून टीकेची झोड उठली आहे. एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. सत्ता गेल्यापासून फडणवीसांचं मानसिक संतुलन ढळत चालले असल्याची टीका अनिल गोटे यांनी केली. तसेच फडणवीस सरकारमधील मंत्री हे तेव्हा काय चिंचोके गोळा खात होते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांवर अत्यंत गंभीर आरोप करत, ‘मी केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीतील एका तरी प्रकरणाची चौकशी आपण केली का?’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. “मी स्वतः कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले आणि कोणत्या नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, व ते कोणाकडे उतरवले. याची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली होती, पण मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी मंत्रांना क्लीनचीट दिली.” असा आरोप अनिल गोटेंनी केला.

अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज अशा शब्दांमध्ये संबोधलं आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाटलेल्या नोटा वर्षा बंगल्यावर छापल्या होत्या का? असा सवालही त्यांनी फडणवीसांना विचारला. त्याबरोबरच, फडणवीसांच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीवरून नुसती नजर फिरवली तरी सर्व लक्षात येईल, असं अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

सचिन वाझेंनी दिलेला जबाब खोटा; ‘त्याच’ गाडीत मनसूख हिरेन यांची हत्या?

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात 10 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा

बँक संबंधित महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे फक्त 3 दिवस; ‘या’ कारणाने पुढचे 8 दिवस बँक राहणार बंद

इंग्रजी शिकताना झाली गंमत, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहा व्हिडिओ

“लवंगी फटाका की, बाॅम्ब लवकरच स्पष्ट होईल”; देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More