नवी दिल्ली | भारतात पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादरम्यान काही गडबड होऊ नये म्हणून फेसबुक सज्ज झालं आहे.
निवडणुकीच्या काळात फेसबुककडून कोणती माहिती लीक होणार नाही याची काळजी फेसबुक घेत आहे. भारतातील फेसबुकचे उच्च अधिकारी मार्क झुकरबर्ग यांच्या संपर्कात आहेत. भारतातील सोशल मीडियाच्या हालचालींवर खुद्द फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग नजर ठेवणार आहेत.
दरम्यान, विविध पक्षांचे सोशल मीडिया अधिकारी, पेज सांभाळणारे, मीडिया सल्लागार आणि व्हिडिओ एडिटर या सगळ्यांना सोबत घेऊन फेसबुक काम करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-विरोधकांना मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीत युती न करण्याचा चंद्रशेखर राव यांचा निर्णय
-अर्जुन-परिणीतीच्या ‘नमस्ते इंग्लंडचे’ पोस्टर प्रदर्शित
-रूपयाची किंमत कमी झाल्यामुळे तुमच्यावर ‘हे’ परिणाम होतील
-वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठ्यांचा काहीही संबंध नाही- पोलिस आयुक्त
-रुपया गडगडल्यामुळे काँग्रेस-आपचा मोदी सरकारवर निशाणा