बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फेसबुकने नाव बदललं अन् ट्विटरने उडवली खिल्ली, म्हणाले…

नवी दिल्ली | प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या नव्या पर्वाला आता सुरूवात झाली आहे आणि याची सुरूवात कंपनीच्या नावात बदल करून करण्यात आली आहे. सगळ्यांचं आवडतं फेसबुक आता ‘मेटा’ या नावाने ओळखलं जाणार आहे. मेटा हे फेेसबुक कंपनीचं नवं नाव असुन ते मेटावर्स तयार करण्यास मदत करणार आहे. या घोषणेनंतर ट्विटरने फेसबूकची अप्रत्यक्षपणे फिरकी घेतली.

ट्विटरने एक ट्विट शेअर करत मोठी बातमी, लाॅल, मस्करी करतोय, आम्ही अजूनही ट्विटरच आहोत, असं म्हटलं आहे. या ट्विटवर अनेक ऑफिशीअल अकाऊंट्सने रिप्लाय केला आहे. यामध्ये मेकडाॅनल्डसने देखील प्रतिक्रीया देत तुम्ही अजून तुमचे 59.6 मिलीयन मॅकनगेट्स नेलेले नाही, असा रिप्लाय दिला. यावर आम्ही आता 60 मिलीयन झालो असल्याचा रिप्लाय ट्विटरने केला.

मेटावर्स अशी जागा आहे जिथे आपण 3D मध्ये खेळु आणि कनेक्ट करू शकत असल्याचं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे. तर मेटा हे सोशल कनेक्शनचं पुढचं पर्व असल्याचंही फेसबुक अर्थात मेटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, फेसबुकवर होणाऱ्या सततच्या आरोपामुळे लोकांचं लक्ष विचलीत करण्यासाठी फेसबुकने नाव बदललं असल्याचं टीकाकार म्हणत आहे. ट्विटने फिरकी घेतल्यानंतर ‘मी’ या कंपनीने देखील फेसबुकला टोला लगावत आम्ही आमचं नाव मीट ठेवत असल्याचं म्हटलं आहे.

पाहा ट्विटः

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”

‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दिवाळीमध्ये स्कीनला द्या आणखी ग्लो, करा ‘हे’ घरगुती उपाय

“लाडक्या आर्यनला बेल मिळाला, आता जनतेच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद घेणार का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More