बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

72 तास अन्नत्याग आंदोलनकर्त्या शेतकऱ्याची तब्येत खालावली

लातूर | महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. सरकारने शेतकऱ्यांना जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीची भरपाई तर जाहीर केली आहे. मात्र सप्टेंबर महिन्यातील नुकसानीची भरपाई अजूनही जाहिर झालेली नाही. त्यामुळे लातूरमध्ये सोमवारी 72 शेतकऱ्यांनी 72 तास अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्यातच आता एका शेतकऱ्याची तब्येत बिघडल्याचं समोर आलंय.

तब्येत बिघडल्याने या शेतकऱ्याला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. मराठवाड्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. सर्व पीकं पाण्याखाली गेली आहेत. नद्यानाल्यांना पूर आल्याने पुर्ण खरिप हंगाम शेतकऱ्यांकडून निसटला आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहिर करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करताना दिसतोय. त्यातच शेतकऱ्यांनी लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय

या आंदोलनामध्ये भाजपचे आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार रमेश कराड हे देखील सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहिर करण्यात यावी या मागणीसाठी आमदार संभाजी पाटील- निलंगेकर आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही काल जाहिर करण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकावर टिका केली आहे.

त्यांनी ठाकरे सरकारला सुनावत, ते म्हणाले,”अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाकडे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या 72 तास अन्नत्याग आंदोलनात एका शेतकऱ्याची तब्येत बिघडली आहे. त्याला अॅडमिट केलं आहे. परंतु लखीमपूर हिंसाचारावरून महाराष्ट्र बंद ठेवणाऱ्या सरकारला मात्र अद्याप या शेतकऱ्यांची दखल घ्यावी वाटत नाही.” असं त्यांनी ट्विटमध्ये लिहीलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलार संतापले

खून का बदला खूनसे! भारतीयांनी अवघ्या 24 तासांत केला दहशतवाद्यांचा खात्मा

साउथची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली आई; तब्बल एक वर्षानंतर केला खुलासा

“केंद्रीय मंत्रिमंडळात सर्व दहशतवादी भरले आहेत”

चौकशीदरम्यान अटक झाल्यास युवराज सिंगला जामीनावर सोडा – उच्च न्यायालय

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More