Top News

फारूख अब्दुल्ला म्हणतात, आम्ही भारतीयच पण…

नवी दिल्ली | आम्ही भारतीयच आहोत पण कलम 35 अ आणि कलम 370 आमच्यासाठी महत्वाचं आहे. ते हटवता कामा नये, असं जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काॅन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

जम्मु-काश्मिरला विशेष दर्जा प्राप्त करून देणारं कलम 35 अ आणि कलम 370 बाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. यावर अब्दुल्लांनी संसद परिसरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

कलम 35 अ आणि कलम 370 हटवता कामा नये. या कलमांवरच आमचा पाया टिकून आहे, असंही फारूख अब्दुल्ला म्हणाले आहेत.

दरम्यान, कलम 35 अ आणि कलम 370 हटवू नये, असाच एकंदरीत सूर जम्मु-काश्मिरवासियांचा आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गिरीश महाजन देशातील मोठे नेते आहेत- संजय राऊत

-काँग्रेसला मोठा धक्का… ‘या’ नेत्याने दिला राजीनामा; करणार भाजपत प्रवेश

मनसेची ‘ही’ भूमिका आग्रही; पण आम्हाला मान्य नाही- शरद पवार

-“पक्षाला तुमची गरज आहे…पक्ष सोडू नका; उदयनराजेंचं मी बघतो”

-‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी आझम खान यांनी मागितली माफी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या