बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! अखेर प्रियंका आणि राहुल गांधींना लखीमपूर खेरीला जाण्यास परवानगी

लखनऊ | उत्तर प्रदेश सरकारच्या धोरणाविरोधात सध्या देशभर काॅंग्रेस आंदोलन करत आहे. देशातील वातावरण ढवळून टाकणारी अत्यंत क्रुर घटना लखीमपूर खेरी येथे घडली आहे. केंद्रीय कृषी कायद्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गाडी घातल्यानं 4 शेतकऱ्यांसह आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी राजकीय पक्षांनी लखीमपूर खेरीला भेट देण्याचा प्रयत्न केला आहे. या विरोधात योगी आदित्यनाथ सरकारनं कलम 144 लागू केलं होतं.

काॅंग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी आणि राज्यसभा खासदार दिपेंदर हुड्डा यांना गेली 2 दिवस झालं नजरकैदेत ठेवलं होतं. आज काॅंग्रेस खासदार राहुल गांधी आपल्या शिष्टमंडळासह लखीमपूर खेरीला भेट देण्यासाठी निघाले होेते. राहुल गांधी येणार असल्यानं लखनऊमध्ये कलम 144 लागू करण्यात आले होते. पण अचानक योगी सरकारनं आपला निर्णय बदलला आहे. राहुल गांधी यांच्यासह काॅंग्रेसच्या इतर खासदार आणि नेत्यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राहुल गांधी यांच्या सोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थान काॅंग्रेसचे नेते सचिन पायलट, काॅंग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल हे नेते लखीमपूरला भेट देणार आहेत. यापुर्वी उत्तर प्रदेश सरकारने प्रियंका गांधी आणि दिपेंदर हुड्डा यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. प्रियंका गांधी यांनी आपण शेतकऱ्यांच्या परिवाराला भेटल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचं जाहीर केलं होत.

काॅंग्रेसच्या आक्रमकतेसमोर अखेर आता योगी सरकार झुकलं दिसत आहे. केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्यानं उत्तर प्रदेशमधील परिस्थिती बिघडलेली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांतर्फे देशभर आंदोलन चालू आहे. ज्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडले ती गाडी केंद्रीय मंत्र्यांची होती हे स्पष्ट झालं आहे.

थो़डक्यात बातम्या 

…आणि म्हणून काँग्रेस उद्यापासून ‘जेलभरो’ आंदोलन करणार

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रुग्णालयात दाखल

शिवसेना खासदार पुत्राचा पालघरमध्ये पराभव

कायदा मोडणार नाही, पण लखीमपूरला जाणारच; राहुल गांधींचं मोठं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More