ठाकरे सरकारने सांगितलेला ‘हा’ नवा नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या नियमांची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये 27 मार्चपासून म्हणजेच आजपासून कोरोनाबाबत नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये काही नियम असे काही की नागरिकांनी त्या नियमांचं पालन केलं नाही तर त्यांना भुर्दंड बसणार आहे.
आजपासून रात्री 12 वाजल्यापासून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये, असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे. तसं आढळल्यास 1 हजार रुपये दंड नागरिकांना भरावा लागणार आहे. तर मास्कविना फिरताना आढळल्यास 500 रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
आज रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत. होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. सरकारने घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान संपूर्ण संचारबंदीचा निर्णय सुनील चव्हाण यांनी घेतला आहे. तर ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगानं वाढतं आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणं सांगून लॉकडाऊन लावा, अशा सूचना मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.
🚨Directions for Containment & Management of COVID-19🚨 pic.twitter.com/n7SNEUw7vN
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 27, 2021
थोडक्यात बातम्या-
‘सचिन सावंतांना उत्तर द्यायला भाजपचे ‘हे’ नेते खंबीर’; फडणवीसांनी उडवली खिल्ली
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 30 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत संपूर्ण संचारबंदी
मोठी बातमी! ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर, वाचा एका क्लिकवर
‘मी त्यासाठी आयुष्यात कधीच खेळलो नाही’; विराट कोहलीने मांडलं रोखठोक मत
“राज्यातील ठाकरे सरकार काॅंग्रेसच्या टेकूवर उभं आहे हे लक्षात ठेवा”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.