Top News मुंबई

‘या’ कारणामुळे सासऱ्याचा होता सुनेवर राग; उचचलं अत्यंत धक्कादायक पाऊल!

मुंबई | आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासऱ्यांनी सुनेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईतील कांदिवली परिसरात हा प्रकार घडल्याचं समोर आलंय.

मुख्य म्हणजे सासऱ्यांनी हत्येनंतर महिलेचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय.

आपल्या मुलाशी आंतरजातीय विवाह केल्यामुळे सासऱ्याचा सुनेवर राग होता. याच रागातून सासऱ्यांनी सुनेची हत्या केली. समतानागर पोलीस स्टेशनमध्ये या मुलीची बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांकडून या घटनेची चौकशी करत असताना मालवणीमध्ये 24 डिसेंबर रोजी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला. महिलेच्या वडिलांनी मृतदेहाची ओळ्ख पटवली आणि संपूर्ण प्रकाराचा खुलासा झाला.

थोडक्यात बातम्या-

…अन् भर पत्रकार परिषदेत मेहबूब शेख ढसाढसा रडले!

डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येबद्दल पोलीस तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर

भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडण्यात कधीच यश मिळणार नाही- शरद पवार

मोठी बातमी! आयटी रिर्टन’बाबत केंद्र सरकारने केली मोठी घोषणा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या