बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत परतल्यानंतर परमबीर सिंहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना न्यायालयाने फरार घोषित केलं होतं. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख( Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसूलीचे धक्कादायक आरोप केल्यानंतर परमबीर सिंह गायब होते. त्यानंतर अनेक दिवसांपासून  बेपत्ता असलेले परमबीर सिंह मुंबईत दाखल असून गुन्हे शाखेकडून परमबीर सिंह यांची सात तास चौकशी करण्यात आली आहे .

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन, माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत, असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल, असं एका वृत्तवाहिनीशी बोलताना परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे.

गुन्हे शाखेकडून सुरू असलेली परमबीर सिंह यांची चौकशी पुर्ण झाली असून परमबीर सिंह यांनी सर्व आरोप फेटाळल्याची माहिती आहे. मात्र, परमबीर सिंह यांच्यावर अनेक आरोप असल्याने वेगवेगळ्या प्रकरणामध्ये परमबीर सिंह यांना पुन्हा चौकशीला सामोर जावं लागणार आहे.

दरम्यान, परमबीर सिंह यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा धक्कादायक आरोप निवृत्त एसीपी शमशेर पठाण (Retired ACP Shamsher Pathan) यांनी केला आहे. परमबीर सिंह यांनी दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल लपून ठेवला होता, असा गंभीर आरोप शमशेर पठाण यांनी परमबीर यांच्यावर केला आहे. सदर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पठाण यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

आता पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार, सरकारचा मोठा निर्णय

“साखरेला चांगला भाव मिळतोय, आमच्या ऊसाचा भावही वाढवा”, राजू शेट्टींचा एल्गार

अण्णा हजारेंची तब्येत बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल

पोलिसाला लाच घेताना पकडण्यासाठी स्वतः आमदारच बनला ट्रकचालक, पाहा व्हिडीओ

पुण्याला मिळणार आणखी एक मंत्रिपद?, नाना पटोलेंनी स्वतः दिली गुडन्यूज

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More