माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी वयाच्या 88 व्या वर्षी केली कोरोनावर मात
नवी दिल्ली | देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 19 एप्रिलला त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. मनमोहन सिंह यांनी कोरोना व्हायरस लशीचे दोन्हीही डोस घेतले आहेत.
मनमोहन सिंह यांनी वयाच्या 88 व्या वर्षी कोरोनावर मात केली. ‘एम्स’ रुग्णालयातून त्यांना आज सोडण्यात आलं आहे. 4 मार्च आणि 3 एप्रिलनंतर त्यांनी कोरोनाचे दोन्ही लस घेतले होते. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच ते ठीक होण्यासाठी प्रार्थना केली जात होती.
डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. ते सन 2004 ते 2014 या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते. डॉ. सिंग यांच्यावर हृदयाची यशस्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज विक्रमी भर पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने दरदिवशी दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून लसींचा तुटवडा, ऑक्सिजनचा पुरवठा कमी तसेच रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा, बेड्सची अपुरी संख्या अशा अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होते.
Former PM Manmohan Singh discharged from AIIMS Trauma Centre in Delhi, after recovering from #COVID19: AIIMS Official
He was admitted here on April 19th. pic.twitter.com/YzjSJmZGmk
— ANI (@ANI) April 29, 2021
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या सरकारला ‘या’ सूचना
राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?”; गोपीचंद पडळकर यांची राजेश टोपेंवर टीका
पुण्यात शववाहिकांचा तुटवडा; प्रादेशिक परिवहन विभागाने ‘या’ वाहनांना दिली शववाहिकेची परवानगी
लसीचे 2 डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह पण पूर्णपणे ठणठणीत- मुख्यमंत्री अशोक गहलोत
Comments are closed.