महाराष्ट्र मुंबई

“अजित पवारांना मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे”

मुंबई | राज्य मंत्रिमंडळाची 20 जानेवारीला बैठक झाली होती. त्या बैठकीला मंत्र्यांच्या गैरहजेरीवरुन अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून राज्यातील मंत्री कॅबिनेट विषयी गंभीर नाहीत, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केलाय.

अजित पवारांना कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहाण्यासाठी मंत्र्यांना तंबी द्यावी लागत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे, असं  गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे

आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय, अशी स्थिती राज्य सरकारमध्ये असल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली आहे.

दरम्यान, भाजपचा कोणताही नेता कुठेही जाणार नाही. अनिल देशमुख यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य द्यावं, असा टोला गिरीश महाजनांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

सोनू सूदला उच्च न्यायालयाचा मोठा झटका; कारवाई होण्याची शक्यता

दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर, शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

“आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत”

भारत विरुद्ध इंग्लंड मालिका पाहण्याचा विचार करताय?; थोडं थांबा BCCI देणार गुडन्यूज!

बच्चू कडूंच्या नेतृत्वात निघणार काॅंग्रेसचा मोर्चा, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या