देश

चीनकडून जागतिक व्यवसायावर ताबा, मोठ्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी

Loading...

मुंबई | संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडल्यानंतर चीनने जगातील व्यवसाय-उद्योगावर ताबा मिळण्याच्या कारवाया सुरू केल्याचं समोर आलं आहे. चीनच्या काही बलाढ्य कंपन्या जगातील बड्या कंपन्यांची हिस्सेदारी खरेदी करत आहेत.

चीनचे व्यापारी केंद्र असलेल्या ‘वुहान’चा कोरोनामुळे विध्वंस झालेला असतानाही चीनमधील बाजार तेजीत कसं?, याचं कोडं जाणकारांना पडलं आहे.

जागतिक बाजारात चीन लपूनछपून समभाग विकत घेत आहे. चीनची सगळ्यात मोठी कंपनी अलीबाबाने 1.54 टक्के आणि टेनसेंटने 0.39 टक्के नफा एकाच आठवड्यात कमावला आहे, असं फोर्ब्सचे शेअर बाजारतज्ज्ञ ब्रँडन हर्न यांनी सांगितलंय.  चीनच्या कंपन्या हाँगकाँग शेअर बाजाराचा निर्देशांक ‘हेंग-सेंग’च्या माध्यमातून बाजारात शेअर खरेदी करत आहेत. या कारणामुळे हेंग-सेंगमध्ये 32 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली आहे.

चीनमधील शेअर बाजारांची आगेकूच सुरू असताना जगातील व्यापार मात्र ठप्प झाला आहे. शेअर बाजार घसरत आहेत. चीनवगळता संपूर्ण आशिया खंडातील शेअर बाजारांत 10 टक्क्यांची सरासरी घसरण झाली आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन

आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत

महत्वाच्या बातम्या-

डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती; महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्लाॉ

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपणॉ

सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या