नवी दिल्ली | महिला मंडळींसाठी सोनं (Gold) हे खूप जवळची गोष्ट असते. त्यामुळे आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्त्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना. त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो.
एक चांगली आणि उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे सोन्याच्या भाव नेहमीच गरम पहायला मिळतो. मल्टी कमॉडिटी एक्चचेंजवर सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचा सोन्याचा वायदे भाव (Gold Price Today) केवळ एका रुपयाने घसरला असून 51,584 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
चांदीचा वायदे भाव 222 रुपयांनी घसरला असून 67,265 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. आज चांदी आपल्या रेकॉर्ड स्तरावरुन जवळपास 6 हजार रुपयांहून स्वस्त आहे.
सणासुदीच्या मुहुर्तावर गुंतवणुकदारांसाठी सध्या सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. अशातच आता आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरात मोठी घसरण अनुभवायला मिळाली.
थोडक्यात बातम्या –
“रेल्वेत होणाऱ्या पाकिटमारींचा तपासही सीबीआय आणि ईडीकडून करण्याची गरज”
पुण्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय मागे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…
भारत-रशियाची वाढती जवळीक; अमेरिकेने भारताला दिला ‘हा’ गंभीर इशारा
मोठी बातमी! मोदी सरकार ‘ही’ पण कंपनी विकण्याच्या तयारीत
मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागलं
Comments are closed.