बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खुशखबर; उबर कंपनी देणार फ्रि राईड

नवी दिल्ली | तुम्हाला जर कोरोना लस घेण्यासाठी जायचं असेल तर उबर या कॅब कंपनीने एक भन्नाट ऑफर आणली आहे. उबर ही एक अमेरिकी कॅब कंपनी असून कोरोना लस घेण्यास जाणाऱ्या लोकांसाठी या कंपनीने मोफत राईड देण्याची घोषणा केली आहे.

कंपनीने सध्या ही ऑफर फक्त दिल्ली पुरतीच मर्यादित ठेवली असून सरकारची मदत करण्याचा कंपनीचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. उबर या कंपनीने दिल्लीत तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या मोफत राईड ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात दिल्ली व्यतिरिक्त देशातील तब्बल 34 शहरांमध्ये ही सुविधा देण्यात येणार असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

उबर कंपनीतर्फे ग्राहकांना लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी ही ऑफर लागू असेल तसेच ग्राहकांना लसीकरण केंद्रावर मोफत जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी प्रोमो कोड दिला जाणार आहे. या प्रोमोकोडद्वारे साधारण 150 रुपये एका बाजूचे असलेले  भाडे हे माफ होणार आहे, तसेच परत घरी येतानाही तोच प्रोमो कोड वापरून ग्राहक पुन्हा एकदा मोफत राईड घेऊ शकतात, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारला मदत करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत आणि जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण मोहिमेला पार पाडण्यासाठी आम्ही सरकारची मदत करत असल्याचं उबर इंडिया आणि साऊथ एशिया अध्यक्ष प्रभजीत सिंह यांनी सांगितलं आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीने उचललेल्या या पावलाचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना ‘हे’ महत्वाचे आदेश

कोरोनाची लस घेण्याआधी ‘या’ 5 गोष्टी आवर्जून टाळा; डॉक्टरांच्या महत्त्वाच्या सूचना

चिंता वाढली… पुण्यात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

पुण्यातील कोरोना बेड्स आणि व्हेंटिलेटरची आकडेवारी जाणुन घ्या एका क्लिकवर

एड्स मुक्तीच्या दिशेनं पहिलं पाऊल, समोर आली आनंदाची बातमी!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More