Top News महाराष्ट्र सिंधुदुर्ग

‘आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही’; पडळकरांचा शिवसेनेवर हल्लाबोल

Photo Credit - Facebook/ Sanjay Raut, Gopichand Padalkar

सिंधुदुर्ग | भाजप नेते गोपीचंद पडळकर सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी सामना वृत्तपत्रातून केंद्र सरकारवर करण्यात आलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, सामन्यात काय लिहिलं जातं याची फार दखल घेण्याची गरज नाही, असं म्हणत पडळकरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं.

सामना वृत्तपत्र कोणीही वाचत नाही, सामनामध्ये काय लिहून आलं आहे. हे तुम्ही टीव्हीवर दाखवता मगं ते लोकांना कळत, कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मगं कोकणात सामनाच्या किती प्रती येतात?, असा सवाल पडळकरांनी शिवसेनेला केला.

आमच्या जिल्हयात सामना येतचं नाही, त्यामुळे या विषयावर बोलण्याची मला फारशी गरज वाटत नाही असं म्हणत, पडळकरांनी शिवसेनेवर हल्ला चढवला. सोबतचं सामन्यात काय लिहिलं जातं याची फार दखल घेण्याची गरज नाही, असा सल्लाही यावेळी पडळकरांनी पत्रकारांना दिला.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांवरून केंद्र सरकारवर संजय राऊतांनी सामनाच्या माध्यामातून निशाणा साधला होता. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा, त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील आणि श्रीरामही खूश होतील, असा टोला सामनामधून मोदी सरकारला लगावण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

बॅंकेत कर्मचारी सांगून केलं लग्न पण डोळ्याअंधारी करायचा ‘हे’ उद्योग

‘कृष्णकुंजवर न्याय मिळतो’; मावळवासियांकडून राज ठाकरेंचे आभार

पेट्रोल-डिझेल दर वाढीबाबत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केला मोठा खुलासा!

…म्हणून ‘या’ वकिलानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाहा व्हिडीओ

आज हिंदू समाज थकलाय, ज्या दिवशी तो जागा होईल त्यावेळी…- मोहन भागवत

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या