बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घरात कोणाला कोरोना झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली | घरातील कोणाला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्याला स्पेशल कॅज्युअल लिव्ह देण्याची घोषणा केली आहे. पर्सनल मिनिस्ट्रीने याबाबतचा आदेश काढला आहे.

केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्याला जर हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज भासली तर 15 दिवसांच्या स्पेशल लिव्हनंतर त्यांना कोणत्याही प्रकारची आणखी सुट्टी मिळू शकते. हॉस्पिटलमधून कुटुंबीय डिस्चार्ज होण्यापर्यंत ते ही सुट्टी घेऊ शकतात, असं या आदेशात म्हटलंय.

जर कोणी कर्मचारी स्वत: कोरोना बाधित झाला असेल तर त्याला 20 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी ही सुट्टी वापरता येणार आहे.

दरम्यान, एखादा कर्मचारी कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलाईज झाला असेल तरीदेखील त्याला 20 दिवसांची कम्युटेड लिव्ह, एससीएल, अर्न्ड लिव्ह आदी मिळू शकते. यासाठी त्याला हॉस्पिटलाईज झाल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

“उद्धव ठाकरेंचं मोदींशी जमतं पण आमच्याशी का जमत नाही माहित नाही”

‘2024 मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा का?’; जयंत पाटील म्हणाले….

लहान मुलांसाठी अनोखं टेस्टींग किट; 15 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

“अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला”

तरुणाकडून माणुसकीचं दर्शन! अशा प्रकारे वाचवले पक्षाचे प्राण, पाहा व्हिडीओ

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More