Top News पुणे महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज होणार जाहीर!

मुंबई | शुक्रवार 15 जानेवारी रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. आज निवडणुकांची मतमोजणी होणार असून, काय निकाल लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ७९ टक्के मतदान झाले. तर काही ठिकाणच्या ग्रामपंचायतीत बिनविरोधी निवडणूक पार पडली आहे. त्यामुळं आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

१४ हजार २३४ एकूण ग्रामपंचायतींसाठी निवडणूका होणार होत्या. परंतू १ हजार ५२३ ग्रामपंचायतींची बिनविरोध निवडणूक पार पडली. तर २६ हजार १७८ उमेदवार बिनविरोधी निवडून आले. ४६ हजार ९२१ एकूण प्रभागांमध्ये निवडणूक पार पडली.

दरम्यान, राज्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी, हिवरे बाजार आणि औरंगाबाद मधील पाटोदामध्ये ३० वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी काय निकाल लागणार? या निकालांवर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘2019 च्या सत्तास्थापनेची अजित पवारांशी नाही तर….’; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

 “देशाच्या पंतप्रधानांना आव्हान देण्याची त्यांची ऐपत नाही”

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी कोरोना लस का घेतली नाही?- प्रकाश आंबेडकर

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार; संजय राऊतांची घोषणा

“जर कोणत्या पक्षाला युती धर्माचं पालन करता येतं तर तो पक्ष…”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या