उदयनराजेंनी मला धमकी दिली; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा आरोप

मुंबई |मला हजारो धमकीचे फोन आले त्यात साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचाही फोन आला होता, असा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.   

मराठा आरक्षणाच्या कायद्याविरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज दुपारी उच्च न्यायालायातील सुनावणी संपल्यांनतर माध्यमांशी बोलताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जालन्यातील वैजनाथ पाटील या युवकानं हल्ला केला होता.

मला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश असताना पोलीसांनी सहकार्य केलं नाही, पोलीसांनी माझा छळ केला असा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली आहे. सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.  

महत्वाच्या बातम्या –

-निकालाआधीच काँग्रेसचं सेलिब्रेशन सुरु ; लावले विजयाचे बॅनर

-धुळे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता; विरोधकांचा सूपडा साफ

-मराठा आरक्षणविराेधी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला 

-भाजपला सर्वात मोठा धक्का; केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाहंचा राजीनामा

-कोल्हापुरात भाजपला झटका, महापाैरपदी राष्ट्रवादीने मारली बाजी