बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंनी ‘ती’ एक गोष्ट केली असती तर वेदांता आज महाराष्ट्रात असता

मुंबई | वेदांता-फाॅक्सकॅान (Vedanta-Faxscan) प्रकल्प गुजरातकडे गेला. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण जास्तच तापले आहे. आरोप- प्रत्यारोपाने चांगलाच जोर धरला आहे. विरोधकांकडून भाजप आणि शिंदे गटावर चांगलाच हल्लाबोल केला जात आहे.

या घडामोडींदरम्यान भाजप (BJP) खासदार उन्मेश पाटील यांनी या होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी यावरुन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षात आल्यानंतर आता जनतेची कळवळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी दाखवू नये. सत्तेत असताना वेदांताची सेमी कंडक्टर पाॅलिसी (Semi Conductor Policy) वेळेत आणली असती तर राज्याला आणखी मदत मिळाली असती, असा टोला पाटलांनी आदित्य ठाकरेंंना लगावला.

सत्तेत असताना परेदेशी फिरायला जायला यांना वेळ होता. पेंग्विन (Penguin) आणायला वेळ आहे. राज्यातल्या  खेड्यापाड्यात ते कधी गेले नाहीत. कायदेमंडळाचे सदस्य असताना सभागृह चालवलं नाही. मग ते काय फक्त मलिदा खाण्यासाठी पर्यावरण मंत्री झाले होते का? असा सवालही पाटलांनी विचारला आहे.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More