Hanuman Chalisa | राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी येणार आमने-सामने
नागपूर | हनुमान चालीसा प्रकरणावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अनेेक अडचणींचा सामना करावा लागला. या प्रकरणानं संपूर्ण राज्यभर गदारोळ पहायला मिळाला. अशातच राणा दाम्पत्य आज नागपुरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत.
नागपूरमधील त्यात मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी हनुमान चालीसा पठन करायला आमने-सामने येणार आहे.
पोलिसांनी राणा दाम्पत्यांना काही अटी-शर्तींसह हनुमान चालिसा पठणाला परवानगी दिली आहे. त्यामुळे राणा आणि राष्ट्रवादी समोरासमोर आल्यावर काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, दिल्लीहून विमानानं नागपुरात दाखल झाल्यावर राणा दाम्पत्य पहिल्यांदा हनुमान मंदिरात चालीसा पठण करणार आहे.
थोडक्यात बातम्या –
‘या’ तारखेपर्यंत मान्सून राज्यात धडकणार, हवामान खात्याचा अंदाज
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…
नवनीत राणांना अटक करणं भोवणार?; समोर आली ‘ही’ महत्त्वाची माहिती
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अजित पवारांचा गंभीर इशारा, म्हणाले…
अविनाश भोसले यांच्याविषयी कोर्टानं दिला मोठा निर्णय!
Comments are closed.