हार्दिक आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे डीएनए एकच!

अहमदाबाद | हार्दिक पटेल आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे डीएनए एकच आहेत, असं वक्तव्य गुजरातमधील काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहिल यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झालाय.

हार्दिकनं ज्याप्रमाणे भाजपशी दोन हात केलं, समाजाच्या मागण्यांसाठी तो लढतो आहे, ते पाहता सरदार वल्लभभाई पटेल यांचे आणि हार्दिकचे डीएऩए एकच आहेत असं दिसतंय, असं ते म्हणालेत. 

दरम्यान, हार्दिक पटेल आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची तुलना करण्यावर भाजपनं जोरदार आक्षेप घेतलाय. हा सरदार पटेलांचा अपमान अाहे, असं भाजपनं म्हटलंय.